Universal Acceptance Logo
Ministry of Electronics and Information Technology Logo
NIXI Logo

इमेल पत्त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण (इएआय)

this infographics shows how indian languages use for email Internationalization. In this inforgraphics there are indian langauges letters that moving aroung laptop

स्थानिक भाषांमध्ये इमेलेचा पत्ता (माझेनाव@निक्सि.भारत)

ईमेल पत्त्याचे आंतरराष्ट्रीयकरण (ईएआय) म्हणजे ईमेल पत्त्यांसाठी आस्की (ASCII) अक्षरांव्यतिरिक्त अक्षरे वापरण्याची परवानगी देणे हे आहे. ह्यात इंग्रजीवर आधारलेल्या ईमेल पत्त्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक आस्की अक्षरांव्यतिरिक्त हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती किंवा तमिळ इत्यादी भाषांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अक्षरांचा समावेश आहे. ह्यामुळे लोकांना इमेल पत्ते तयार करण्यासाठी त्यांची स्वभाषा आणि लिपी वापरता येते, ह्याने त्यांना महाजालवर संवाद साधणे सोपे होते.

इएआय इमेल पत्त्यांमध्ये आस्की अक्षरांव्यतिरिक्त अक्षरे वा वर्ण दाखवण्यासाठी युनिकोड एन्कोडिंग मानक वापरते आणि त्यासाठी इमेल क्लायंट आणि इमेल सर्व्हर या दोघांद्वारे इमेल हाताळण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, इमेल क्लायंटला वापरकर्त्याच्या इंटरफेसमध्ये आस्की अक्षरांव्यतिरिक्त अक्षरे दाखवण्यास समर्थ असणे आवश्यक आहे आणि इमेल सर्व्हर आस्की अक्षरांव्यतिरिक्त पत्त्यांवर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्यास आणि योग्य पत्त्यावर निरोप पोहोचवण्यास समर्थ असणे गरजेचे आहे.

इएआयला साहाय्य करण्यासाठी अनेक तांत्रिक मानके बनवली आहेत, ज्यात एसएमपीटीयूटीएफ८चा समावेश आहे, जे आस्की अक्षरांव्यतिरिक्त अक्षरांतील इमेल पत्ते हे सिंपल मेल ट्रांसफर प्रोटोकॉल (एसएमटीपी) आणि आयडीएनए२००८ वापरुन पाठविण्याची परवानगी देते, जे महाजालद्वारे वापरल्या जाणाऱ्या एएससीआयआय-आधारित डोमेन नेम सिस्टम (डीएनएस) ह्यामध्ये आस्की अक्षरांव्यतिरिक्त अक्षरांतील डोमेन नावांचे भाषांतर करू देते.