Universal Acceptance Logo
Ministry of Electronics and Information Technology Logo
NIXI Logo

गोपनीयतेचे धोरण

भाषानेट पोर्टल कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती आपोआप घेत नाही, (उदा. नाव, फोन नंबर किंवा इ-मेलेचा पत्ता), जेणेकरून आम्ही तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखू शकू. जर संकेतस्थळावर तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली, ती कोणत्या विशिष्ट हेतूंसाठी केली जाते त्या हेतूबद्दल तुम्हाला सांगितले जाईल आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा उपाययोजना केली जाईल.

आम्ही भाषानेट संकेतस्थळावर स्वेच्छेने दिलेली कोणतीही वैयक्तिक ओळखण्यायोग्य माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला (सार्वजनिक/खाजगी) विकत देत नाही का साधी वाटतही नाही. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीला नुकसान, त्याचा गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा प्रकटीकरण, बदल किंवा विनाश यापासून वाचवले जाईल. आम्ही वापरकर्त्याचे इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पत्ते, डोमेन नाव, ब्राउझरचा प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे इत्यादी माहिती गोळा करतो. जोपर्यंत संकेतस्थळाचे नुकसान करण्याचा प्रयत्न आढळत नाही तोवर आमच्या पानाला भेट देणार्‍या व्यक्तींच्या ओळखीशी आम्ही हे पत्ते जोडण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.