Universal Acceptance Logo
Ministry of Electronics and Information Technology Logo
NIXI Logo

सर्वोत्तम पद्धती

iconic image of शीर्ष-स्तरीय डोमेन (टीएलडी) साठी मदत उदाहरणासाठी   .भारत , सरकार.भारत

शीर्ष-स्तरीय डोमेन (टीएलडी) साठी मदत उदाहरणासाठी .भारत , सरकार.भारत

हिंदी, तमिळ आणि मराठीसारख्या भारतीय भाषांमध्ये आपले डोमेन नाव मिळवा उदा. सीडॅक.भारत

विद्यमान आस्की डोमेनच्या समतुल्य आयडीएन मिळवा.

आपले डोमेन नाव स्थानिक भाषेत रूपांतरित (भाषांतरित / लिप्यंतरित) करा. एनआयसी / .IN रजिस्ट्री मान्यताप्राप्त निबंधक (सरकारसाठी NIC .भारत डोमेन आणि . IN रजिस्ट्री मान्यताप्राप्त निबंधकांसाठी . भारत डोमेन नावांसाठी नोंदणीकर्ता / वापरकर्ता आयडीएनमध्ये उपलब्ध भाषेत डोमेन नावाचे भाषांतर आणि लिप्यंतरण देतात.

तुमचे डोमेन वैध करा

आपल्या स्थानिक भाषेच्या डोमेन नावांना वैधता नियमे वापरून प्रमाणित करा कारण काही भारतीय भाषेतील अक्षरे हल्ले (स्पूफिंग) / दहशत पसरवणारे हल्ले (फिशिंग) टाळण्यासाठी अवरोधित केली जातात जसे की इंग्रजी डोमेन नावांमध्ये केवळ अक्षरे, अंक आणि (-) हायफन घालता येतात. (एलडीएच).

तुमचे डोमेन तयार करा / त्याची नोंदणी करा

संपर्क, डोमेन नाव, पुनीकोड स्ट्रिंग आणि नाव सर्व्हर तपशील एनआयसी / .IN रजिस्ट्री मान्यता प्राप्त निबंधकाला द्या. पुनीकोड युनिकोड डोमेन नावाच्या समतुल्य एक ओळ (स्ट्रिंग) आहे. काही विक्रेते नोंदणी करताना पुनीकोडची अपेक्षा करू शकतात. एनआयसी/ .IN रजिस्ट्री मान्यताप्राप्त निबंधक डोमेन नावे तयार करतात आणि नोंदणीकर्ता / वापरकर्त्यास सागंतात.

आपला वेब सर्व्हर कॉन्फिगर करा

तुमच्या संकेतस्थळवरील सर्व्हरला युनिकोड / पुनीकोडसाठी येणाऱ्या विनंत्या स्वीकारणे आवश्यक आहे. सर्व प्रमुख वेब-सर्व्हर एकाच कोडवर एकापेक्षा जास्त संकेतस्थळांना इंगित करण्यासाठी समर्थन देतात. आपले आयडीएन डोमेन नाव वेबमास्टर / होस्टिंग करणाऱ्यास सांगा. तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार विद्यमान संकेतस्थळ किंवा संबंधित भारतीय भाषेच्या संकेतस्थळांवरून येणाऱ्या पुनीकोडला जुळवण्यासाठी त्यांना रूटिंग नियम लिहावे लागतील. आता वापरकर्त्याला इंग्रजी आणि भारतीय दोन्ही भाषांच्या डोमेन नावांसह आपले संकेतस्थळ पाहाता आले पाहिजे.

पुनीकोड डोमेन नावांसह एसएसएल प्रमाणपत्र बनवा

एसएसएल प्रमाणपत्रे आपल्या संकेतस्थळाला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात म्हणून तुम्हाला नवीन एसएसएल प्रमाणपत्र विकत घेणे किंवा विद्यमान एसएसएल प्रमाणपत्रात पुनीकोड स्ट्रिंग जोडणे आवश्यक आहे. नवीन / अद्ययावत एसएसएल तुमच्या सर्व्हरवर कॉन्फिगर करणे आवश्यक आहे. आता वापरकर्त्याला इंग्रजी आणि भारतीय दोन्ही भाषांच्या डोमेन नावांसह आपले संकेतस्थळ पाहाता आले पाहिजे.
banner-1
banner-2

भारतीय भाषांमध्ये इमेल सेवा वापरा

तुम्हाला इमेल सेवा पुरवणारा किंवा एखादा अनुप्रयोग देवनागरी, तमिळ किंवा बंगालीसारख्या भारतीय लिपीत असलेल्या इमेल पत्त्यांवर इमेल पाठवू आणि मिळवू शकेल याची खात्री करा. इमेल सेवा पुरवणाऱ्याने ईएआय (इमेल पत्ता आंतरराष्ट्रीयीकरण) सारख्या आंतरराष्ट्रीयीकृत इमेल मानकांचा वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून भारतीय लिपी आणि टीएलडी सह इमेल पत्ते योग्यरित्या प्रेषित होतीत आणि मिळतील.

आयसीएएनएन आणि युनिव्हर्सल एक्सेप्टन्स स्टीअरिंग ग्रुप (यूएएसजी) ह्यासारख्या संस्थांनी ठरवलेली यूए मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा आणि यूएला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोणत्याही संबंधित समस्या सोडवण्यासाठी डोमेन निबंधक, सेवा पुरवणारे आणि सॉफ्टवेअर विक्रेत्यांसह इतर भागधारकाशी सहकार्य करा.