Universal Acceptance Logo
Ministry of Electronics and Information Technology Logo
NIXI Logo

नियम व अटी

"भाषानेट" चे हे संकेतस्थळ सर्वसामान्यांना आणि विकासकांना माहिती देण्यासाठी बनवण्यात आले आहे. या संकेतस्थळावर दिलेली सर्व कागदपत्रे आणि माहितीचा वापर फक्त संदर्भासाठी आहे आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचा कोणताही अभिप्राय नाही. भाषानेट संकेतस्थळ संकेतस्थळावरील माहिती, मजकूर, ग्राफिक्स, दुवे किंवा इतर गोष्टीच्या अचूकतेची किंवा पूर्णतेची हमी देत नाही. भाषानेटच्या कोणत्याही सूचनेशिवाय संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करण्यासाठी वा दुरुस्ती करण्यासाठी बदलू शकते.

जे काही सांगितले आहे आणि जे काही संबंधित कायदा, नियम, विनियम, धोरण विधाने इत्यादींमध्ये नमूद आहे जर त्यात काही तफावत असल्यास, नमुद केलेले ग्राह्य धरले जाईल. संकेतस्थळ स्थानिक भाषा आवृत्ती राष्ट्रीय वापरासाठी दिलेली. कोणत्याही प्रकारची संदिग्धता / शंका / स्पष्टीकरण / चूक इत्यादी बाबतीत कृपया इंग्रजी सामग्रीचा आधार घ्या.

संकेतस्थळावरील काही दुवे तृतीय पक्षांच्या अखत्यारित असलेल्या इतर संकेतस्थळावरील माहिती वा संसाधनांकडे नेतात ज्यांच्यावर भाषानेटचे अजिबात नियंत्रण नाही का त्यांच्याशी भाषानेटचा काहीही संबंध नाही. हे संकेतस्थळ भाषानेटच्या बाहेर आहेत आणि त्यांना भेट देऊन; तुम्ही भाषानेट आणि त्याच्या अखत्यारित बाहेर आहात. या संकेतस्थळाला भेट देण्यामुळे आणि व्यवहार केल्याने वापरकर्त्याला लागू पडू शकतात अशा कोणत्याही प्रकारची मान्यता देत नाही किंवा कोणताही निर्णय किंवा हमी देत नाही आणि कोणत्याही वस्तू किंवा सेवांची सत्यता, उपलब्धता किंवा कोणतीही प्रत्यक्ष हानी, नुकसान किंवा अप्रत्यक्ष हानी किंवा परिणाम त्याचबरोबर स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांचे कोणतेही उल्लंघन यासाठी कोणतीही जबाबदारी किंवा दायित्व स्वीकारत नाही.

हे संकेतस्थळ भाषानेट टीमने डिझाइन, विकसित आणि होस्ट केले आहे. या वेबसाइटवरील माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले असले तरी, कायद्याचे विधान म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये किंवा कोणत्याही कायदेशीर हेतूंसाठी हे वापरले जाऊ नये. भाषानेट सामग्रीची अचूकता, पूर्णता, उपयुक्तता किंवा इतर कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. वापरकर्त्यांना संबंधित सरकारी विभाग( अनेक विभाग) आणि/किंवा इतर स्त्रोतांतून माहिती सत्यापित/तपासण्याचा सल्ला दिला जातो आणि संकेतस्थळावर दिलेल्या माहितीवर कृती करण्यापूर्वी योग्य व्यावसायिक सल्ला घ्यावा. संकेतस्थळाच्या वापराच्या संबंधात कोणत्याही परिस्थितीत भाषानेट कोणत्याही मर्यादेशिवाय, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम, वा नुकसान, किंवा डेटाच्या वापरामुळे उद्भवलेल्या कोणत्याही खर्च, तोटा किंवा नुकसानासह कोणत्याही खर्चासाठी, तोट्यासाठी किंवा नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावर दिलेल्या इतर संकेतस्थळाचे दुवे हे फक्त सर्वांच्या सोयीसाठी दिलेले आहेत. भाषानेट दुव्यातील कोणत्याही संकेतस्थळावरील माहिती वा सामग्रीसाठी किंवा त्याच्या विश्वासार्हतेसाठी जबाबदार नाही आणि त्यांच्यामध्ये दिलेल्या कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही. आम्ही अशा जो़डलेल्या पृष्ठांच्या उपलब्धतेची हमी देऊ शकत नाही.

आम्हाला इमेल पाठवून योग्य परवानगी घेतल्यानंतर या संकेतस्शवावरील वैशिष्ट्यीकृत सामग्री/ माहिती विनामूल्य पुनरुत्पादित केली जाऊ शकते. तथापि, सामग्री अचूकपणे पुनरुत्पादित केली गेली पाहिजे आणि अपमानास्पद रीतीने किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भात वापरली जाऊ नये. माहितीचे कोणतेही चुकीचे किंवा अपूर्ण किंवा दिशाभूल करणारे पुनरुत्पादन झाल्यास, ज्या व्यक्तीने ती पुनरुत्पादित केली आहे किंवा प्रकाशित केली आहे तीच परिणामांसाठी पूर्णपणे जबाबदार असेल. जेथे सामग्री प्रकाशित केली जात आहे किंवा इतरांना दिली जात आहे, तेथे स्रोत ठळकपणे लिहिणे आवश्यक आहे. तथापि, या सामग्रीचे पुनरुत्पादन करण्याची परवानगी तृतीय पक्षाचा कॉपीराइट म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोणत्याही सामग्रीपर्यंत विस्तारित होणार नाही. अशा सामग्रीचे पुनरुत्पादन करण्यासाठी संबंधित विभाग / कॉपीराइट धारकांकडून प्राप्त करणे आवश्यक आहे.