Accessibilty toolbox
color contrast
text size
highlighting content
zoom in
Copyright@  
Universal Acceptance Logo
Ministry of Electronics and Information Technology Logo
NIXI Logo

युएचा भारतातील क्रार्यक्रम

यूए भारत कार्यक्रम हा एक बहुभागधारक कार्यक्रम आहे ह्याचा मुख्य उद्देश्य सामान्य यूए जागरूकता पसरवणे आणि यूएचा अधिकाधिक वापर करण्यास लोकांना प्रोत्साहन देणे हा आहे. आज आंतरजालाचा विस्तार होऊन भारतीय भाषांसह जगातील विविध भाषा आणि लिपींमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या डोमेन नावाचा समावेश झाला आहे. भारत हा टिंब भारत (.bharat)आणि समतुल्य सीसीटीएलडी ह्यांतर्गत सर्व २२ अनुसूचित भारतीय भाषांमध्ये डोमेनचे नाव देऊ करण्यात अग्रस्थानी आहे.

व्यवसायाची व्याप्ती आणि संधी वाढविण्यासाठी, अनुप्रयोग आणि सेवांसाठी यूए महत्त्वपूर्ण आहे. सामान्यपणे, लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेवर विश्वास असतो आणि त्यांना ह्या भाषेत संभाषण करणे सोपे असते. कोणत्याही सरकारी, सामाजिक, बँकिंग आणि इतर ऑनलाइन अनुप्रयोगांमध्ये भाग घेण्यासाठी बिगर-इंग्रजी भाषिकास स्थानिक भाषेची ओळख (म्हणजे ईमेल पत्ता) वापरणे सोपे आहे.

यूए ग्राहकांना त्यांच्या भाषेत विविध देशांमधे इव्हेंट-आयटम / तंत्रज्ञान / सेवा प्रदान करून त्यांच्या ग्राहकआधाराचा विस्तार करण्यास मदत करतो. अनेक व्यवसाय आता आपसात संवाद साधू शकतात, माहिती सामायिक करू शकतात, इव्हेंट-आयटम देऊ शकतात, तंत्रज्ञान आणि सेवासुद्धा व्यावसायिकाच्या भाषेत करू शकतात त्याचबरोबर ते विश्वास निर्माण करू शकतात आणि पुढील अब्जांहून अधिक वापरकर्त्यांना ऑनलाइन आणताना प्रचंड व्यवसाय क्षमता निर्माण करू शकतात. सर्वसमावेशकता आणि स्वीकृती वाढावा ह्यासाठी सरकारी सेवा वापरकर्त्याशी त्यांच्या स्थानिक भाषेत संवाद साधू शकतात.

यूए इंडिया कार्यक्रम अंमलबजावणीचे टप्पे:

UA INDIA Programme Infographics